एक्स्प्लोर
PCMC News : जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद
जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
pcmc
1/9

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
2/9

शहरातील सर्व भागातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहेत.
3/9

अनेक शाळा, महाविद्यालयेदेखील बंद आहेत.
4/9

जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बंदची हाक दिली होती.
5/9

त्याला सकाळच्या सत्रात पिंपरी-चिंचवडकरानी प्रतिसाद दिला आहे.
6/9

निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, पिंगळेगुरव, पिंपळे सौदागर भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद आहेत. अनेक कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत.
7/9

काही महाविद्यालयांनी परीक्षेचे आजचे पेपर रद्द केले आहेत. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
8/9

पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.
9/9

या ठिकाणी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे धरून निषेध आंदोलने करण्यात येणार आहे.
Published at : 09 Sep 2023 11:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
विश्व
मुंबई
राजकारण
























