Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report
सोशल मिडियाचा अतिवापर हा सध्याच्या लाईफस्टाईलमधला सर्वात मोठा गंभीर प्रश्न बनलाय.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन सरकारने १६ वर्षांखालील मुलांवर सोशल मिडिया बंदीचा नियम लागू केला. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाबद्दल जगभरात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या. तर काही देश सोशल मिडियावरच्या नियंत्रणासाठी ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू करता येईल का याचा विचार करु लादगले. आता भारतातल्या सोशल मिडयाच्या भस्मासुराला आणि त्याच्या दुष्परिणामांना आवरण्यासाठी मद्रास उच्च न्यायलयाने केंद्र सरकारला दिलेला सल्ला कमालीचा चर्चेत आहे
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सध्या सोशल मिडियाच्या व्यसनापासून कुणीही वाचू शकलेलं नाही.
सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवही प्रत्येक युझरला आहे..
तरीही या सोशल मिडियाची झिंग काही उतरत नाही.
९ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातलीये...
अशा प्रकारची बंदी लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आहे.
आता ऑस्ट्रेलियाच्या पावलावर पाऊल टाकत भारत सरकारनेही अशी बंदी लागू करण्याचा विचार करावा असा सल्ला मद्रास उच्च न्यायालयाकडून दिला गेलाय.
न्यायमूर्ती जी. जयचंद्रन, न्यायमूर्ती के. के. रामकृष्णन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी
दोन्ही न्यायमूर्तींचं सोशल मीडिया वापराविषयी गंभीर निरीक्षण
मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची वेळ आल्याचं मत
सध्याचे भारतातले आयटीचे नियम तक्रार आणि कारवाई पुरते मर्यादीत असल्याचं निरीक्षण
तर कठोर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाप्रमाणे वयोमर्यादेचा कायदा अधिक प्रभावशाली ठरु शकतो अशी सूचना
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची भारतातही अंमलबजावणी करावी या विषयी आपल्या देशात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसतात.
सोशल मिडियाचं व्यसन लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची मागणी अनेकांकडून होते
तर त्याचवेळी अशी बंदी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यावरची गदा अशीही ओरड होताना दिसते.
All Shows

































