एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती

Ajit Pawar Politics : ज्या ठिकाणी मुस्लिम मतं आणि विरोधी मतं जास्त आहेत त्या ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात तर मविआ सक्षम असलेल्या ठिकाणी ते महायुतीत असल्याचं दिसतंय.

मुंबई : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या विरोधात लतोय. यामागे विरोधकांची स्पेस काबीज करण्याची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या विरोधातील पुरोगामी विचारांची मतं एकगठ्ठा विरोधकांकडे न जाता ती अजित पवारांच्या पक्षाकडे वळावीत यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा कसा होतो याचं एक उदाहरण म्हणजे बीड नगरपरिषदेत भाजपला आणि पवारांच्या राष्ट्रवादीला हरवत निवडून आलेला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष. तीच रणनीती महानगरपालिकेत यशस्वी होईल का? हे पाहावं लागेल.

एकीकडे सरकारमध्ये सत्तेची ऊब... तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांमध्ये विरोधाची भूमिका. आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांची ही खेळी आहे की अडचण, असा सवाल सध्या विचारला जात आहे. कारण राज्यातील बहुतांश महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मात्र अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिला आहे किंवा थेट महाविकास आघाडीतल्या पक्षांशीच हातमिळवणी केली.

Ajit Pawar Mahayuti Politics : विरोधकांची स्पेस व्यापली

त्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी विरोधकांची स्पेस कायम असते. अजितदादांना विरोधात उतरवून विरोधकांची हीच स्पेस संपवून टाकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे की काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे. भाजप विरोधातील पुरोगामी विचारांची मतं काँग्रेस किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे न जाता ती अजित पवारांकडे जावीत यासाठीचा हा चक्रव्यूह असल्याचं बोललं जातंय.

BJP Strategy On Muslim Votes : मुस्लिम मतं विभागण्यासाठी रणनीती?

ज्याठिकाणी विरोधकांची आघाडी मजबूत आहे अशा कोल्हापूर, चंद्रपूर , अकोला, नांदेड, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली सारख्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मदत करण्यासाठी अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचं दिसतंय. मात्र जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि ती मतं विरोधी पक्षांकडे जाऊ शकतात अशा छत्रपती संभाजीनगर, धुळे, परभणी , अमरावती अशा महापालिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय.

मुंबई महापालिकेत नवाब मलिक यांना पुढे करून अजित पवारांच्या पक्षाने भाजप आणि शिंदे सेनेला हिंदुत्वाचा मुद्दा वापरता येईल याची काळजी घेतल्याचं बोललं जातंय. अजित पवारांनी भाजप नेतृत्वाच्या सोबत चर्चा करून ही रणनीती ठरवली असावी असं विश्लेषकांचे म्हणणं आहे आणि प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाने या चर्चेला आणखी बळ मिळालंय.

राज्यातील सत्तेत सहभागी असलेले तीन पक्ष काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषदच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र त्यांनी ना एकमेकांवर टीका केली ना कारभाराचा पंचनामा केला. त्यामुळं त्या निवडणुकीतील विजय देखील तीन पक्षांनी एकत्रित एन्जॉय केला. तेच धोरण महापालिका निवडणुकांमध्ये राबवून विरोधकांची स्पेस देखील काबीज करण्याची रणनीती आखण्यात आलीय का? त्यामुळेच अजित पवार विरोधात लढतायत का? प्रशांत जगतापांच्या पक्षांतरामुळे हे प्रश्न आणखी मोठे होत चालल्याचं दिसतंय.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Shiv Sena Symbol Case : शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget