BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
BMC Election 2025-26 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे मुंबईची निवडणूक लढतोय.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झालेली आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात ली आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या मेराज सिद्दीकी यांनी पक्ष मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये ताकदीनं निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. समाजवादी पार्टीकडून लवकरच इतर वॉर्डमधील उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत.
समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत कोणाला संधी?
1.वॉर्ड 20 – मोहम्मद अजहरुद्दीन सिद्दीकी
2.वॉर्ड 64 – डॉ. शीला अखिलेश यादव
3.वॉर्ड 90 – सना अब्बास कुरैशी
4.वॉर्ड 96 – सुभाष शेख शब्बीर
5.वॉर्ड 134 – शायर शाहबाज खान आझमी
6.वॉर्ड 135 – शहबाज सबीर शेख
7.वॉर्ड 136 – रुबाबा नाजीन सिद्दीकी
8.वॉर्ड 137 – अहद युनूस कुरेशी
9.वॉर्ड 140 – आप्पाती विद्यासागर डावर
10.वॉर्ड 141 – जायद इमरानुल्ला कुरेशी
11.वॉर्ड 142 – ज्योती लक्ष्मण गुडे
12.वॉर्ड 143 – आयेशा रहमतुल्ला सरदार
13.वॉर्ड 148 – साक्षी सुनीलकुमार यादव
14.वॉर्ड 174 – डॉ. आरामा ठाकूर
15.वॉर्ड 181 – मोहम्मद आदिल मुमताज शेख
16.वॉर्ड 188 – गौस मोहिउद्दीन लतीफ खान
17.वॉर्ड 201 – इरफान साजिद अहमद सिद्दीकी
18.वॉर्ड 212 – अमरीन शहज़ाद अब्दुल्ला
19.वॉर्ड 213 – डोमिनिक मलिक
20.वॉर्ड 220 – गुलाम मखदूरी
21.वॉर्ड 224 – रुखसाना जाफर टीमवाला
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असणार की नाही हे देखील स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026





















