एक्स्प्लोर
छत्रपतींचा रायरेश्वर किल्लाही मतदानासाठी सज्ज!
शिडी आणि दोरखंडाच्या सहाय्याने निवडणूक साहित्य गडावर दाखल
election
1/8

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वर किल्ल्यावर घेतली त्या रायरेश्वर किल्यावर मतदान होणार आहे.
2/8

मतदानासाठी मतदान यंत्रे आणि इतर साहित्य शिडीच्या सहाय्याने पोहचवण्यात आले आहे.
3/8

साडेचार हजार फुट उंचीवरील रायरेश्वर किल्ल्यावर 160 मतदार आहेत.
4/8

त्यांच्यासाठी किल्ल्यावर एक मतदान केंद्रं तयार करण्यात आले असून तीन निवडणूक अधिकारी मतदानाची प्रक्रिया सांभाळणार आहेत.
5/8

शिवकाळापासून रायरेश्वर किल्ल्यावर जंगम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातील 160 जण मतदानासाठी पात्र आहेत.
6/8

त्यांच्यासाठी शिडी आणि दोरखंडाच्या सहाय्याने निवडणूक साहित्य पोहच करण्यात आले.
7/8

गडावर पोहचल्यावर मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांना एक तास चालावं लागलं.
8/8

रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यात येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
Published at : 06 May 2024 05:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















