एक्स्प्लोर
PM Modi Mumbai : मेट्रोसह विविध विकासकामांचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात काय काय घडलं - जाणून घ्या
PM Modi Mumbai Visit
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले होते.
2/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं.
3/10

यानंतर ते बीकेसीकडे रवाना झाले.
4/10

बीकेसी येथे मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते.
5/10

या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
6/10

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींमुळे विकास कामना चालना मिळाली.
7/10

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भाषणानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं.
8/10

यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे''.
9/10

आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मुंबईच्या विकासाला गती देणार.
10/10

सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी गुंदवली ते मोगरापाडा या दरम्यान मेट्रोचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी तरुण आणि महिलांशी संवाद साधला.
Published at : 19 Jan 2023 08:44 PM (IST)
आणखी पाहा























