एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Saptshrungi Devi : ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’; वणीच्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ! पहा फोटो
Saptshrungi Devi Mandir : 'सप्तशृंगीचा उदो उदो, आई राजा उदो उदो' अशा जयघोषात सप्तशृंगी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
Nashik saptshrungi devi
1/10

'सप्तशृंगीचा उदो उदो, आई राजा उदो उदो' अशा जयघोषात सप्तशृंगी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
2/10

साडेतीन शक्तीपीठांपैकी (Navratri 2023) अर्धशक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या गर्दीने दणाणून गेला आहे.
3/10

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आज 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे.
4/10

सकाळी सात वाजेच्या सुमारास सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट कार्यालयापासून ते देवी मंदिरापर्यत देवीच्या आभूषणांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
5/10

तसेच सप्तशृंगी देवी मंदिरात विधिवत पूजा करून घटस्थापना देखील करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
6/10

आज सकाळी सात वाजता ट्रस्टच्या मुख्य कार्यालय ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली.
7/10

पंचामृत महापूजा व आभूषणांची मिरवणूक पार पडल्यानंतर घटस्थापना कार्यक्रम जगमलानी यांचे हस्ते संपन्न झाला.
8/10

भाविकांच्या दर्शनासह घटस्थापनेसाठी लागणारी अखंड ज्योत आणण्यासाठी हजारो नवरात्र मित्र मंडळ गडावरून गावोगावी ज्योत नेण्यात आली.
9/10

नवरात्रोत्सवादरम्यान देवी मंदिर 24 तास खुले ठेवणार असून, यादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजा, दुपार महान आरती व सायंकाळी सांज आरती होणार आहे.
10/10

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या गर्दीने दणाणून गेला आहे.
Published at : 15 Oct 2023 05:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























