एक्स्प्लोर
कार नाल्यात बुडाली, पाणी नाकातोंडात शिरलं, बाहेर येण्याची धडपड व्यर्थ ठरली; दिंडोरीतील अपघातात 7 जणांचा मृत्यू
Nashik Dindori Accident: अल्टो कारमधील प्रवासी हे नाशिकहून नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परतत होते.
Nashik Accident
1/7

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
2/7

अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल नाल्यात कोसळली आणि या दुर्घटनेत कारमधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
3/7

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्टो कारमधील प्रवासी हे नाशिकहून नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परतत होते.
4/7

त्यावेळी दिंडोरी बाजार समितीच्या जवळ कार आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेनंतर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट नाल्यात जाऊन पडली.
5/7

या अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं.
6/7

मात्र, चारचाकीमधून बाहेर पडता न आल्यामुळे गाडीतील लोकांचे नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
7/7

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू आहेत.
Published at : 17 Jul 2025 10:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























