एक्स्प्लोर
Nashik Satyajeet Tambe : एकच वादा, सत्यजीत दादा, औक्षण, कार्यकर्त्यांचा जल्लोष, सत्यजित तांबेचे विजयी स्वागत
Nashik Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबे यांचं औक्षण करण्यात येऊन कार्यकर्त्यानी जल्लोष केला.

Nashik Satyajeet Tambe
1/10

नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला असून सत्यजित तांबे यांनी अखेर दणदणीत विजय मिळवला आहे.
2/10

गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून पुन्हा एकदा तांबे कुटुंबीयांकडे सत्यजीत तांबेच्या रूपात चौथी टर्मही पाहायला मिळणार आहे.
3/10

राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघांचा निकाल लागला असून या सर्वांमध्ये नाशिकच्या पदवीधर निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे.
4/10

यावेळी मतमोजणी केंद्राबाहेरच कार्यकर्त्यानी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. तर तांबे कुटुंबीय आज नाशिकमध्येच असल्याने अनेक कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले.
5/10

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले असून सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मत मिळाली आहेत.
6/10

तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मत मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.
7/10

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला.
8/10

पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. सुरवातीपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला.
9/10

युवा नेतृत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजित तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत.
10/10

जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदार संघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजित तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.
Published at : 03 Feb 2023 12:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
