एक्स्प्लोर
Independence Day 2025 : मालेगावात माजी सैनिकांकडून ध्वजारोहण, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडेंसह 'या' कलाकारांची उपस्थिती, पाहा PHOTOS
Independence Day 2025 : नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या वेंकटेश्वरा फॉर्म येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Independence Day 2025
1/10

नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ अजंग वडेल शिवारात वेंकटेश्वरा फॉर्मवर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
2/10

हा कार्यक्रम माजी सैनिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या वेंकटेश्वरा फॉर्मतर्फे आयोजित करण्यात आला.
3/10

स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
4/10

रॅलीमध्ये मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, भारत गणेशपुरे, गौरव मोरे, शिवाली परब यांसारखे मराठीतील नामवंत कलाकार सहभागी झाले.
5/10

माजी सैनिकांनी ५०० एकरांवर अत्याधुनिक शेती सुरू करून जय जवान, जय किसान या घोषणेची खरी झलक साकारली.
6/10

शेतकरी व जवान यांना मानसन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, हा संस्थेचा मुख्य हेतू आहे.
7/10

वेंकटेश्वरा फॉर्मचे नेतृत्व डॉ. शिवाजीराव डोळे करतात.
8/10

शेती, शिक्षण, आरोग्य आणि आत्मनिर्भरता यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागाचा विकास करण्याचा मानस आहे.
9/10

माजी सैनिक आणि शेतकरी एकत्र येऊन देशसेवेला नवा अर्थ देत आहेत.
10/10

या उपक्रमाच्या माध्यमातून सैन्य, शेती आणि कला क्षेत्रातील एकत्र येणे हे एक सामाजिक एकात्मतेचे उदाहरण बनले आहे.
Published at : 15 Aug 2025 11:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























