एक्स्प्लोर
गृहउद्योगातून आर्थिक समृद्धी, शहाद्याच्या पापड उद्योगाची भरारी...
Nandurbar success story
1/9
![नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) येथील सुरज फूड इंडस्ट्रीने (Suraj Food Industries) पापड उद्योगातून भरारी घेतली आहे. 1990 मध्ये सुरू केलेला हा गृह उद्योग आता मोठ्या व्यवसायात रुपांतरित झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) येथील सुरज फूड इंडस्ट्रीने (Suraj Food Industries) पापड उद्योगातून भरारी घेतली आहे. 1990 मध्ये सुरू केलेला हा गृह उद्योग आता मोठ्या व्यवसायात रुपांतरित झाला आहे.
2/9
![जवळपास 300 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यातून रोजगार प्राप्त होत आहे. पापड उद्योगाच्या माध्यातून आर्थिक समृद्धी आली आहे. पाहुयात पापड उद्योगाची भरारी...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जवळपास 300 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यातून रोजगार प्राप्त होत आहे. पापड उद्योगाच्या माध्यातून आर्थिक समृद्धी आली आहे. पाहुयात पापड उद्योगाची भरारी...
3/9
![1990 साली परिसरातील महिलांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. यावेळी पारस जैन यांनी सुरज फूड इंडस्ट्री सुरू केले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1990 साली परिसरातील महिलांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. यावेळी पारस जैन यांनी सुरज फूड इंडस्ट्री सुरू केले.
4/9
![महिलांना पापड बनवण्यासाठी दिले. ते पापड बाजारपेठेत पारस पापड नावाने विक्रीसाठी मार्केटिंग सुरू केले. बघता बघता जैन यांच्यामुळं 300 पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळू लागला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
महिलांना पापड बनवण्यासाठी दिले. ते पापड बाजारपेठेत पारस पापड नावाने विक्रीसाठी मार्केटिंग सुरू केले. बघता बघता जैन यांच्यामुळं 300 पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळू लागला.
5/9
![जैन यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू ठेवला. हा व्यवसाय परिसरातील अनेक परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जैन यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू ठेवला. हा व्यवसाय परिसरातील अनेक परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे.
6/9
![हा व्यवसाय अनेक निराधार महिलांचा जीवनाचा आधार झाला असून, पारस पापड आणि इतर वस्तूंचा देशभरातील बाजारपेठेत बोलबाला झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हा व्यवसाय अनेक निराधार महिलांचा जीवनाचा आधार झाला असून, पारस पापड आणि इतर वस्तूंचा देशभरातील बाजारपेठेत बोलबाला झाला आहे.
7/9
![शहादा सारख्या ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत. त्यासोबत अनेक कुटुंब पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळं उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, पारस पापडच्या माध्यमातून शहरातील 300 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शहादा सारख्या ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत. त्यासोबत अनेक कुटुंब पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळं उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, पारस पापडच्या माध्यमातून शहरातील 300 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.
8/9
![पापड उद्योगाच्या माध्यमातून दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई होत असल्यानं कुटुंबाचा गाडा हाकणे सोपे झाले असल्याच्या प्रतिक्रिया या उद्योगात काम करणाऱ्या महिला देतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पापड उद्योगाच्या माध्यमातून दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई होत असल्यानं कुटुंबाचा गाडा हाकणे सोपे झाले असल्याच्या प्रतिक्रिया या उद्योगात काम करणाऱ्या महिला देतात.
9/9
![कोणताही व्यवसाय करताना सचोटी शुद्धता आणि प्रामाणिक प्रयत्न राहिले तर त्याचे वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही हे सुरज फूड इंडस्ट्रीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/05/53f7d74329e382a39e2fa36271180cf486c3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणताही व्यवसाय करताना सचोटी शुद्धता आणि प्रामाणिक प्रयत्न राहिले तर त्याचे वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही हे सुरज फूड इंडस्ट्रीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.
Published at : 05 Feb 2023 08:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)