Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
India vs New Zealand ODI Schedule Marathi News : भारताने शुक्रवारी अखेरच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली.

New Zealand Tour of India 2026 : हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती अर्धशतकांनंतर वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर भारताने शुक्रवारी अखेरच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकांत 5 बाद 231 धावा केल्या. पाहुण्यांना 20 षटकांत 8 बाद 201 धावांवर रोखत भारताने विजय मिळवला असून, आता भारतीय संघ घरच्या मैदानावर जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठी क्रिकेट मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात प्रथम 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. अशा प्रकारे दोन्ही संघांमध्ये एकूण 8 रोमांचक सामने रंगणार आहेत.
11 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात
भारत–न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जाईल, तर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये होणार आहे. मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना 18 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. वनडे मालिकेतील सर्व सामने दुपारी 1:30 वाजता सुरू होतील.
रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार
या मालिकेचे खास आकर्षण म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे पुन्हा मैदानात दिसणार आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही दिग्गज पुन्हा खेळताना दिसणार असल्याने संघाला अनुभवाची मोठी ताकद मिळणार आहे. तसेच युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधीही मिळेल.
21 जानेवारीपासून टी-20 मालिकेचा थरार
वनडे मालिकेनंतर टी-20 वर्ल्ड कपच्या अगोदर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये होईल. दुसरा सामना 23 जानेवारीला रायपूर येथे, तर तिसरा सामना 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टणम येथे होणार असून, मालिकेचा अंतिम सामना31 जानेवारीला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने सायंकाळी 7:00 वाजता सुरू होतील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (India vs New Zealand ODI Schedule)
पहिला एकदिवसीय सामना - 11 जानेवारी - वडोदरा - दुपारी 1:30 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना - 14 जानेवारी - राजकोट - दुपारी 1:30 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना - 18 जानेवारी - इंदूर - दुपारी 1:30 वाजता
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक (India vs New Zealand T20 Series Schedule)
पहिला टी-20 सामना - 21 जानेवारी - नागपूर - संध्याकाळी 7:00 वाजता
दुसरा टी-20 सामना - 23 जानेवारी - रायपूर - संध्याकाळी 7:00 वाजता
तिसरा टी-20 सामना - 25 जानेवारी - गुवाहाटी - संध्याकाळी 7:00 वाजता
चौथा टी-20 सामना - 28 जानेवारी - विशाखापट्टणम - संध्याकाळी 7:00 वाजता
पाचवा टी-20 सामना - 31 जानेवारी - तिरुवनंतपुरम - संध्याकाळी 7:00 वाजता
हे ही वाचा -





















