R. Madhavan On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
R. Madhavan On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्ना सगळी लाईमलाईट घेऊन गेल्यामुळे आर. माधवन झाकोळला गेला? यावर अभिनेत्यानं म्हटलंय की, "पब्लिक अटेंशनच्या बाबतीत मी अंडरडॉग आहे... पण अक्षय खन्ना वेगळ्याच लेव्हलवर आहे..."

R. Madhavan On Akshaye Khanna Dhurandhar Movie: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित सिनेमा 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सध्या बॉक्स ऑफिस (Dhurandhar Movie Box Office Collection) गाजवतोय. अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर फिल्म बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) जोरदार कमाई करतेय. अशातच, 15 दिवसांतच ही फिल्म कमर्शियली कलेक्शन करतेय. एवढंच काय तर, क्रिटिक्सही फिल्मचं जोरदार कौतुक करत आहेत. अशातच सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकला आहे. पण, कौतुक मात्र अक्षय खन्नानं साकारलेल्या रहमान डकैतचं होतंय. या सिनेमात अक्षय खन्ना व्यक्तीरिक्त रणवीर सिंह, आर. माधवन (R. Madhvan), संजय दत्त (Sunjay Dutt) यांसारखी स्टार कास्ट झळकली आहे. अशातच एकीकडे अक्षय खन्नावर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय, पण त्यामुळे दुसरी स्टार कास्ट झाकोळली गेलीय का? अशा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण, यावर आता सिनेमात अजय सान्याल ही भूमिका साकारणारा चाहत्यांचा लाडका मॅडी म्हणजेच, आर. माधवन अक्षय खन्नामुळे झाकोळला गेलाय का? यावर आता स्वतः अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेला? (R Madhavan Being Overlooked For Akshaye Khanna)
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना यावर खुद्द आर. माधवननं भाष्य केलंय. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नानं सर्व लाईमलाईट घेतलीय, त्यामुळे आर. माधवन नाराज आहे, असं बोललं जातंय. यावर अभिनेता म्हणाला की, "अजिबात नाही... मी अक्षयसाठी खूप जास्त आनंदी आहे... त्याला मिळणाऱ्या प्रेमासाठी आणि कौतुकासाठी तो पात्र आहे..."
View this post on Instagram
आर. माधवन यांनं अक्षय खन्नाचं कौतुक केलंय, त्याला एक अतिशय 'प्रतिभावान' आणि 'जमिनीशी जोडला गेलेला' अभिनेता म्हटलंय. तसेच, आर. माधवननं प्रसिद्धीपासून दूर असलेल्या त्याच्या शांत स्वभावाचंही कौतुक केलं आहे. अक्षयच्या प्रसिद्धीच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना आर. माधवन म्हणाला की, "तो अनेक मुलाखती देऊ शकतो, पण तो घरी बसून त्याला नेहमीच हवी असलेली शांती उपभोगत असतो..."
पब्लिक अटेंशनच्या बाबतीत मी अंडरडॉग, पण अक्षय खन्ना वेगळ्याच लेव्हलवर... : आर. माधवन (R. Madhavan On Akshaye Khanna)
आर. माधवननं पब्लिक अटेंशनबाबत बोलताना सांगितलं की, "मला असं वाटतं की, पब्लिक अटेंशनच्या बाबतीत मी अंडरडॉग आहे... पण अक्षय खन्ना वेगळ्याच लेव्हलवर आहे. त्याला पर्वा नाही... यश आणि अपयश त्याच्यासाठी सारखंच आहे..."
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. ही एक स्पाय-थ्रीलर अॅक्शन फिल्म आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे. तर, अक्षय खन्नानं रहमान डकैतची भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. याव्यतिरिक्त अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांनीही आपल्या अभिनयानं चाहत्यांना इम्प्रेस केलंय. मेकर्सनी आधीच 'धुरंधर'चा सीक्वलही अनाउंस केलं आहे. 'धुरंधर'चा सीक्वल 19 मार्च 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज केला जाणार आहे. 'धुरंधर पार्ट 2' बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाकेदार कामगिरी करेल यात काही शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























