एक्स्प्लोर
हॅलो हॅलो हॅलो....! डिजिटलच्या दुनियेतही नेटवर्क नसलेले गावं; पाहा फोटो
Nanded : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या प्रगतीची गंगा अजूनही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Nanded News
1/10

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सिंगारवाडी या गावातील लोकांना आजही मोबाईल नेटवर्कसाठी (Mobile Network) डोंगराकडे धाव घ्यावी लागते.
2/10

कारण या गावात कोणत्याच कंपनीच्या सिमकार्डला रेंज मिळत नाही. त्यामुळे महत्वाचा फोन करायचा असल्यास गावकरी थेट डोंगराची वाट धरतात.
3/10

'लो दुनिया करलो मुठ्ठी मे' म्हणत आज अनेक मोबाईल कंपन्या बाजारात सेवा देण्यासाठी उतरल्या आहेत.
4/10

शहरापासून गाव, खेडा आणि तांड्यावर देखील सहज मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क केला जातो. त्यामुळे मोबाईल नेटवर्कमुळे जग जवळ आले.
5/10

या डिजिटल जगात माणसांनी एवढी प्रगती केली आहे की, चक्क चंद्र व विविध ग्रहांवर यान सोडले जाताहेत. पण, चंद्रावरच्या गप्पा सुरु असताना आजही अशी अनेक गावे आहेत, जिथे साधे तंत्रज्ञानही पोहोचले नाही.
6/10

कारण राज्यातील वेगवेगळ्या भागात आजही अनेक गावात साधे मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नाही.
7/10

नांदेड जिल्ह्यातील अदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट तालुक्यातील अनेक गावात अजूनही मोबाईलला नेटवर्कच नाही.
8/10

अतिशय डोंगराळ भागात वसलेलं सिंगारवाडी हे गाव अजूनही जगाच्या संपर्कात नाहीय. या गावात कोणत्याच कंपनीचे मोबाईल टॉवर नाही.
9/10

मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेटची सुविधाच नाही. मोबाईल असून नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना उंच टेकडीवर किंवा झाडावर जाऊन नेटवर्कच्या संपर्कात यावं लागत.
10/10

नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतय. त्यामुळे, मोबाईल टॉवर उभारून देण्याची मागणी गावकरी करत आहेत.
Published at : 25 Aug 2023 05:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion