एक्स्प्लोर
PHOTOS : द ग्रेट खली अन् अंकित तिवारींसाठी हजारो नागपूरकरांची हजेरी; खासदार क्रीडा महोत्सवाचे थाटात समारोप
Nagpur : 15 दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात WWE चे द ग्रेट खली आणि अंकित तिवारी यांची उपस्थिती होती. यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत नागपूरकर पोहोचले होते.
क्रीडा महोत्सव समारोप नागपूर
1/10

क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात अंकित तिवारीच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येत तरुणाई यशवंत स्टेडियमवर दाखल झाली होती.
2/10

WWEमधील वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन द ग्रेट खली यांचे स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
3/10

द ग्रेट खली यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत नागपूरकर यशवंत स्डेयिमवर पोहोचले होते.
4/10

क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी द ग्रेट खली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
5/10

क्रीडा महोत्सवात नागपूर सह विदर्भातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूही सहभागी झाले होते.
6/10

समारोपीय कार्यक्रमात धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियम प्रेक्षकांनी भरला होता.
7/10

महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपिठावर असतानाचे हे दृष्य.
8/10

स्टेडियमवर विंगमध्ये लाल रंगाच्या पासेस धारकांसाठी तर समोर असलेल्या खुर्च्यांवर जागा आरक्षित करण्यासाठी निळ्या रंगाच्या पासेस वाटण्यात आल्या होत्या.
9/10

कार्यक्रमाच्या सुरुवातीला द ग्रेट खली यांनी नागपूरकरांना अभिवादन केले.
10/10

या दरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांनीही एक सेल्फी काढून या सोहळ्याच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या.
Published at : 23 Jan 2023 05:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























