एक्स्प्लोर
In Pics : जुन्या पेंशनसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मोर्चा
Winter Assembly Session : शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मोर्च्यात राज्यभरातून शिक्षक सहभागी झाले होते.
1/9

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मोर्च्यात राज्यभरातून मोठ्यासंख्येत शिक्षक सहभागी झाले होते.
2/9

शिक्षकांचा हा मोर्चा संघटन मंत्री आमदार भगवानराव साळुंखे व शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.
3/9

आपल्या मागण्यांसदर्भात शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली. शिक्षकांच्या शिष्टमंडळात अध्यक्ष वेणुनाथ विष्णू कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर. महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, किरण पाटील, भगवान साळुंके यांचा समावेश होता.
4/9

शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी ही मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.
5/9

उच्च माध्यमिक शाळांना वाढीव पदांना मान्यता अनुदान द्या ही मागणीही यावेळी करण्यात आली.
6/9

शाळांमधये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी ही मागणीही शिक्षकांनी घोषणांद्वारे केली.
7/9

उच्च माध्यमिक शाळांना वाढीव पदांना मान्यता अनुदान द्या, यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
8/9

शासनातर्फे शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने भविष्यात याची किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिले.
9/9

आंदोलनात महिला शिक्षकांचीही संख्या लक्षणीय होती.
Published at : 24 Dec 2022 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
भारत
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion