एक्स्प्लोर
Ambedkar Jayanti : आंबेडकर जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भिमसैनिकांची गर्दी
Ambedkar Jayanti : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Deekshabhoomi Ambedkar Jayanti
1/7

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
2/7

14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
3/7

बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते.
4/7

धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती अशा सर्व महत्त्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
5/7

या ठिकाणी लोक येऊन भव्य स्तूपामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करतात, सोबतच बाबासाहेबांच्या अस्थिकलशांचेही दर्शन घेतात.
6/7

स्तूपाच्या समोरच बाबासाहेबांची प्रतिमा असून आज सकाळपासूनच लोक त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावत आहेत.
7/7

त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बाबासाहेबांप्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत.
Published at : 14 Apr 2023 12:47 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
क्रिकेट


















