Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला...
Mohammad Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानं फिटनेसच्या मुद्यावरुन टीम इंडियात संधी न मिळाल्यानं निवड समितीला प्रश्न विचारले होते.

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. फिटनेसच्या मुद्यावरुन मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली नाही. याच मुद्यावर मोहम्मद शमीनं राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रश्न विचारला होता. जर रणडी ट्रॉफीसाठी फिट असेल तर 50-50 म्हणजेच एकदिवसीय सामन्यांसाठी फिट काही नाही, असा सवाल शमीनं केला होता. मोहम्मद शमीनं म्हटलं की रणजी ट्रॉफीत बंगालसाठी तो उपलब्ध असेल तर हे सिद्ध होतं की तो फिट आहे. याबाबत निवड समितीला माहिती देणं त्याचं काम नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करताना निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर यानं मोहम्मद शमीला संघात स्थान न मिळण्याचं कारणं फिटनेस असल्याचं म्हटलं होतं. आता शमीच्या प्रश्नावर आगरकरनं उत्तर दिलं आहे.
Ajit Agarkar answer to Mohammad Shami : अजित आगरकरचं मोहम्मद शमीला उत्तर
दिल्लीतील एका कार्यक्रमात आगरकरला मोहम्मद शमीच्या फिटनेस संदर्भात आणि त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित आगरकरनं संतुलित उत्तर दिलं आणि शमीचं कौतुक देखील केलं.
अजित आगरकर म्हणाला, पाहा तो भारतासाठी अविश्वसनीय परफॉर्मर राहिला आहे. जर त्यानं काही म्हटलं असेल तर मला त्याच्यासोबत किंवा त्यानं माझ्या सोबत बोलायला हवं. इंग्लंड दौऱ्यपूर्वी म्हटलं होतं जर तो फिट असेल तर त्याला संधी मिळेल. मात्र, दुर्दैवानं तो फिट नव्हता आणि देशांतर्गत क्रिकेटचा सीझन आता सुरु झाला आहे, आम्ही पाहू की तो पूर्णपणे फिट आहे की नाही, असं आगरकरनं म्हटलं.
अजित आगरकरनं म्हटलं की ही रणजीची पहिली फेरी सुरु आहे. आम्ही काही आणखी मॅच पाहू तो फिट आहे की नाही. जर तो पूर्ण क्षमतेनं चांगली गोलंदाजी करत असेल तर मोहम्मद शमी सारखा खेळाडू कोणाला नको असेल, असं आगरकरनं म्हटलं.
मोहम्मद शमीनं मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर ठेवल्याबद्दल राष्ट्रीय निवडकर्त्यांवर टीका केली होती. रणजी ट्रॉफीत बंगालसाठी उपलब्ध असेल तर फिट असून याबद्दल निवड समितीला अपडेट देणं काम नाही, असं शमी म्हणाला होता.
मोह्ममद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून खेळला होता. वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी या दोघांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर सर्जरी झाल्यानंतर तो संघातून बाहेर आहे.




















