Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
Yulia Aslamova Viral Video : यूलिनायने तिच्या कामवालीच्या कामाचं मूल्यांकन करण्यासाठी एखाद्या कंपनीप्रमाणे KPI सिस्टीम सुरू केली आहे. त्या आधारे ती दरवर्षी कामवालीच्या पगारात वाढ करते.

Viral News : बंगळुरुमध्ये राहणाऱ्या कंटेंट क्रिएटर यूलिया असलमोव्हा (Yulia Aslamova) ही रशियन महिला सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण तिने आपल्या घरकाम करणाऱ्या कामवालीला (Maid) दरमहा तब्बल 45,000 रुपये पगार देण्यास सुरुवात केली आहे. यूलिया असलमोव्हाने उचललेले हे पाऊल केवळ मोठ्या पगाराचे नाही, तर मानवतेचा आणि आदराचा धडा देणारे आहे.
प्रत्येक कामाला सन्मान हवा, मग ते ऑफिसमधलं असो वा घरकाम... असं मत यूलिया असलमोव्हाने व्यक्त केलं. तिने कामवालीसाठी कंपनीप्रमाणे KPI (Key Performance Indicators) सिस्टीम तयार केली. यामुळे तिच्या मेहनत आणि प्रगतीचे मोजमाप करता येते.
Yulia Aslamova Viral News : नोकरीतून सन्मानाकडे प्रवास
यूलियाने तिची मुलगी एलिनासाठी (Elina) योग्य कामवाली शोधण्यासाठी जवळपास 20 महिलांची मुलाखत घेतली. तिला प्रामाणिक, जबाबदार आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती हवी होती. योग्य व्यक्ती मिळाल्यानंतर तिने पहिल्या वर्षीच 10 टक्के पगारवाढ दिली. नंतर KPI प्रणाली लागू केली आणि प्रत्येक वर्षी परफॉर्मन्सनुसार वाढ दिली.
ती कामवाली आता ड्रायव्हिंग शिकत आहे, आणि लवकरच एलिनाला शाळा-क्लासेसला नेण्याची जबाबदारीही तिच्याकडे असेल. यूलियाने केवळ घरकामासाठी व्यक्ती ठेवलं नाही, तर तिचं करिअर घडवलं आहे.
Yulia Aslamova Video : सन्मान द्या, निष्ठा मिळेल
यूलियाच्या म्हणण्यानुसार, “भारतामध्ये बरेच लोक आपल्या कामवालींशी व्यावसायिक वागणूक ठेवत नाहीत. पण जर आपण आदर, संधी आणि न्याय दिला, तर समोरचाही निष्ठेने काम करतो. जशी आपण आपल्या नोकरीबद्दल विचार करतो, तसंच दुसऱ्यांच्या कामाबद्दलही विचार करा.”
View this post on Instagram
Viral Reactions on Social Media : सोशल मीडियावर चर्चा रंगली
या माहितीनंतर इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. अनेकांनी यूलियाचं कौतुक केलं. तिचे विचार प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं. तर याच्या विरोधातही काही मतं आली. इतका पगार दिल्याने बाजारातील समतोल बिघडेल असं मत काहींनी व्यक्त केलं. काहींनी तर विनोदाने लिहिलं, ही सॅलरी TCS किंवा Infosys मधल्या फ्रेशरपेक्षाही जास्त आहे!
यूलियाचं या सगळ्यावर प्रत्युत्तर मात्र ठाम प्रत्युत्तर आलं. मी संबंध जपण्यावर आणि ते वाढवण्यावर विश्वास ठेवते. माणसांशी वाईट वागाल, तर त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो अशा शब्दात तिने उत्तर दिलं.
ही बातमी वाचा:
























