एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visrajan PHOTO : पालखी निघाली राजाचीssss, लालबागचा राजा मंडपातून निघाला 'तो' क्षण
Lalbaugcha Raja Visrajan PHOTO : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
Lalbaugcha Raja Visrajan PHOTO
1/10

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
2/10

सकाळपासूनच भक्तांच्या गर्दीने लालबाग परिसर गजबजून गेला.
3/10

"गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या नादात लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडला.
4/10

तो क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी जल्लोष केला.
5/10

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळते.
6/10

आज विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताच भक्तांच्या डोळ्यांत भावनिक अश्रू तर ओठांवर बाप्पाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले.
7/10

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तीभावाची लाट या सगळ्यांमध्ये बाप्पाचा निरोप घेतला जात आहे.
8/10

मिरवणुकीत राजाचा मनमोहक देखावा अधिकच खुलून दिसतोय.
9/10

भक्तांनी बाप्पाला शेवटचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या असून संपूर्ण परिसरात भक्तिरस आणि जल्लोषाचे वातावरण आहे.
10/10

लालबागचा राजा मंडपातून निघाला 'तो' क्षण
Published at : 06 Sep 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र























