एक्स्प्लोर
मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित
मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचे नामांतर करण्यात आले असून आता सिंदूर हे नाव या पुलास देण्यात आले आहे.
Mumbai karnak bridge now sindoor
1/9

मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचे नामांतर करण्यात आले असून आता सिंदूर हे नाव या पुलास देण्यात आले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
2/9

भारताने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला समर्पित करत या उड्डाणपुलाचे नाव सिंदूर ठेवण्यात आलं आहे. आता, लवकरच हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येत आहे.
3/9

दक्षिण मुंबईतील पूर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली पूल विभागाचे अभियंते यांनी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत 10 जून 2025 रोजी पूर्ण करण्यात आली आहे.
4/9

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे. 150 वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले.
5/9

मस्जीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
6/9

या पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी 230 मीटर असून पूर्वेस 130 मीटर व पश्चिमेस 100 मीटर इतकी आहे.
7/9

लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीकामी आरसीसी (Reinforced Cement Concrete) आधारस्तंभ यावर (Pier) प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (Girder) स्थापित करण्यात आल्या आहेत. आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
8/9

मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव ह्या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व - पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे.
9/9

पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे 10 वर्षापासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार. पूल कार्यान्वित झाल्यावर पी डि' मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार.
Published at : 08 Jul 2025 08:42 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















