एक्स्प्लोर
Kala Ghoda Festival 2023 : काळाघोडा महोत्सवात शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर
Kalaghoda Festival : मुंबईतील काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात सादर केले आहे.
Kala Ghoda Festival 2023 : काळाघोडा महोत्सवात शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर
1/10

मुंबईतील सुप्रसिद्ध काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्यात आला आहे.
2/10

यंदा कोरो इंडियाने प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला असून संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट येथील क्रॉस मैदानात सादर केले आहे.
3/10

भारतीय समाजाचं वैविध्य, विविध समूहांचं प्रतिनिधित्व दाखवणारं हे आर्ट इंस्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.
4/10

हे शिल्प संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं आणि त्यावरील विश्वास दृढ करणारं आहे.
5/10

या मांडणीशिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे फेस्टिवलचं मुख्य आकर्षण ठरत आहे.
6/10

कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्यं लोकांपर्यंत पोहोचत आहेत. 13 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे.
7/10

विविध कलाप्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आलं नाही, त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या तळातल्या कार्यकर्त्यांनी - या आर्ट इंस्टॉलेशनकरता जमेल ती वर्गणी दिली आहे, हे मांडणीशिल्पाचं वैशिष्ट्य असल्याचे कोरो इंडियाने सांगितले.
8/10

तळातील आवाज कलेच्या माध्यमातून उमटू लागतो, तेव्हा बदलाचे पडसाद उमटतात. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी हे शिल्प पाहावे आणि येथील कार्यक्रमांत सहभाग घ्यावा, असं आवाहन कोरो इंडियानं केलं आहे.
9/10

कोरो इंडिया ही संस्था गेल्या 33 वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी ग्रासरुटवर काम करत आहे.
10/10

यावर्षी कलेच्या माध्यमातून संविधानिक मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोरो इंडियाची टीमही काल घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून लोकांशी संवाद साधत आहे.
Published at : 09 Feb 2023 11:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























