एक्स्प्लोर
Mamta Banerjee: ममता बॅनर्जींची अमिताभ बच्चन यांच्या घरी भेट, राखी बांधत दिल्या शुभेच्छा
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना राखीही बांधली.

Mamata Banerjee Meet Amitabh Bachchan
1/8

INDIA आघाडीच्या बैठकीला मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालतच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
2/8

ममता बॅनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि बिग बींची लाडकी नात आराध्या बच्चन देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत.
3/8

बुधवारी देशभरात राखीचा सण साजरा केला जात आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या.
4/8

त्याची काही छायाचित्रे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ममता बॅनर्जी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत.
5/8

ऐश्वर्या आणि जया बच्चन यावेळी पारंपरिक लूकमध्ये दिसल्या. दोघींनीही क्रीम आणि व्हाईट शेडचा सूट कॅरी केला आहे.
6/8

ममता बॅनर्जी या आज विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये आल्या आहेत.
7/8

अमिताभ बच्चन यांच्या भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्या.
8/8

मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असेल.
Published at : 30 Aug 2023 10:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
विश्व
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
