एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 360 डिग्री फिरणारा तराफा, स्कुबा डायव्हर्सही सज्ज; गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : तब्बल 18 तासांहून अधिक काळापासून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. अखेर मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2025
1/10

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. या दरम्यान राजा मंडपातून बाहेर पडला होता.
2/10

त्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमाराच लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.
3/10

तब्बल 18 तासांहून सुरु असलेली ही भव्य मिरवणूक अखेर गिरगाव चौपाटीवर येऊन पोहोचली आहे.
4/10

लालबागच्या राजाचं यंदाचं विसर्जन हे अत्यंत खास आणि आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे.
5/10

यंदा मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा वापरण्यात येणार आहे.
6/10

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी 360 डिग्री फिरणारा तराफा, स्कुबा डायव्हर्सही सज्ज झाले आहेत.
7/10

दरम्यान, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी देशभरातून दाखल गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली असून सर्वत्र भक्तीचा महासागर बघायला मिळतो आहे.
8/10

आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मध्यरात्री तुफान गर्दी बघायला मिळतेय.
9/10

अवघ्या काही क्षणांतच लाडका बाप्पा विसर्जित होईल.
10/10

जोरदार पावसामध्येसुद्धा गणेश भक्तांकडून मोठा उत्साहात राजाचा विसर्जन केलं जात असल्याचे चित्र आहे.
Published at : 07 Sep 2025 08:59 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























