एक्स्प्लोर
Photo: हत्येच्या मालिकेने यवतमाळ हादरला; रेतीतस्करीतून वाढतेय गुन्हेगारी
वाढलेली संघटित गुन्हेगारी, जिल्ह्यातील अवैध रेती तस्करी यामुळे यवतमाळवमध्ये पुन्हा गुन्हेगारी टोळीही उदयास येत आहे.

Yavatmal Crime news
1/10

जिल्ह्यात दिवसागणिक हत्येच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी एकाच दिवशी राळेगावच्या कलमनेर आणि कळंब या ठिकाणी दोन हत्येच्या घटना घडल्या आहे.
2/10

कळंब येथील तरुणाच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज नागपूर-तुळजापूर हा मार्ग दोन तासापेक्षा जास्त वेळ रोखून धरला होता. जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा संतापच नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला.
3/10

शहरालगतच असलेल्या चौसाळा टेकडीवरती अवैध धंद्यातील गुन्हेगार हे देशी कट्टा चालवण्याचा सराव करत असल्याचंही वास्तव समोर आलं आहे.
4/10

जिल्ह्यात वाढलेली संघटित गुन्हेगारी, जिल्ह्यातील अवैध रेती तस्करी यामुळे पुन्हा गुन्हेगारी टोळीही उदयास येत आहे.
5/10

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याने याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
6/10

सोमवारी कळंब येथील अश्विन राऊत याच्यावर हातोडा आणि चाकूच्या वार करुन पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली.
7/10

राळेगाव येथील अशोक अक्कलवार हे कळमनरीतील शेतात जागलीला गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यावर वरवंटा घालून ठार केले.
8/10

जिल्ह्यात एकामागून एक घडत असलेल्या या गुन्ह्याच्या घटनांमुळे जिल्हा हादरून गेला आहे.
9/10

जिल्ह्यात मागील वर्षभरात 74 खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून या 16 दिवसांत 10 खून झाले आहे. या सर्व घटनामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले. पती-पत्नीतील वाद, मालमत्तेचा वाद तर कुठे अवैध व्यवसायातील वर्चस्वाची लढाई अशा प्रकारच्या कारणांनी या घटना घडल्या.
10/10

त्याचप्रमाणे अवैध धंदे, सावकाराची वसुली, रेती तस्कर यांनी त्यांच्या अवैध धंद्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर सुरू केला आहे. या अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू-सुऱ्याऐवजी देशी कट्टे आले आहेत. या सर्व बाबीचा विचार केला तर जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य बिगडत चालले आहे हे स्पष्ट आहे.
Published at : 17 Jan 2023 07:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
