एक्स्प्लोर
खतरनाक मांज्यापासून वाचण्यासाठी अनोखा उपाय शोधला; अहमदनगरच्या राष्ट्रपती पदकविजेत्या शिक्षकानं बनवलं वज्रकवच!
चायना मांज्यामुळे अनेक लोक जखमी होतात तर अनेकांचा जीव देखील जातो. हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन वेळेला राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक अमोल बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वज्रकवच बनवले आहे.
manja
1/10

मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात पतंग उडवले जातात, बंदी असताना अनेक ठिकाणी चायना मांज्याचा वापर होतो.
2/10

दरवर्षी या चायना मांज्यामुळे अनेक लोक जखमी होतात तर अनेकांचा जीव देखील जातो
3/10

हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन वेळेला राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक अमोल बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वज्रकवच बनवले आहे.
4/10

डोक्यापासून कंबरेपर्यंत उंची असलेल्या आणि काही सेकंदांत अंगात घालता येतं
5/10

लवचिक वज्रकवच जॅकेटमध्ये हाय डेन्सिटी पॉलिप्रॉपीलीन या प्लास्टिकसदृश्य मजबूत पदार्थाचा तसेच हीटलॉनचा वापर करण्यात आला असून घातक मांजाने ते कापले जात नाही.
6/10

चेहरा झाकण्यासाठी घडी करण्याजोगता मुखवटा या जॅकेटला लावलेला आहे.
7/10

जॅकेटवर रात्री चमकणारे रेडियम लावण्यात आले आहे.त्याचे वजन 200 ग्रॅम असून वॉटरप्रूफ आहे.
8/10

पुरुषांसाठी "कांत", स्त्रियांसाठी "कांता" आणि लहान मुलांसाठी"अंगज"अशा नावाचे हे कवच तयार करण्यात आले आहे.
9/10

यासाठी अंदाजे खर्च 100 रुपये आला. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO) कडेही याचे डिझाईन पाठविण्यात आले असून यात येत्या काळात आवश्यक ते बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
10/10

राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक डॉ.अमोल बागुल, निलेश पठारे , सुनिल मोरे यांनी हे कवच बनवलं आहे.
Published at : 15 Jan 2023 09:06 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















