एक्स्प्लोर
Shivrajyabhishek Din 2022 : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा; पाहा सोहळ्याचे खास क्षण!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/314ccba90e2db85915081bbdbfb16574_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shivrajyabhishek
1/8
![आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे. किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/8fd59f843da9b81b087d30c2ea271b2dbf884.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे. किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जात आहे.
2/8
![छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/0e362154dcafbc7fe0a5d7333fb6222245ee8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3/8
![दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य शिवप्रेमी रायगडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/98eb1cebdd85c60bd539f2ab4d30c834d69c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य शिवप्रेमी रायगडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात.
4/8
![कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा मात्र शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/1408e26c460efbdea95c9b77b1ca118e374f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा मात्र शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
5/8
![यंदा 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू ठरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/998fbf0abd0b88ab18bdb6b04c0647ace2124.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू ठरले.
6/8
![दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/f62c31b250287a96eede538f8157fcc811274.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे.
7/8
![संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/c268ea0ec3da0da8fded6add117515e0e45f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात.
8/8
![पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शिवभक्तांनी हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/06/c654d263b16a0bdef8ed6582d35b396390eb8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शिवभक्तांनी हजेरी लावली.
Published at : 06 Jun 2022 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)