एक्स्प्लोर
Shiv Sena Dasara Melava History : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा इतिहास माहित आहे का?
Shiv Sena Dasara Melava History : शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. या दसरा मेळाव्याच्या इतिहासावर एक नजर...
Shiv Sena Dasara Melava History : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हा इतिहास माहित आहे का?
1/11

30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी पहिला दसरा मेळावा पार पडला.
2/11

मार्मिक'मधून पहिल्या दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांचा शर्ट-पँट असा साधा वेश होता.
3/11

शिवाजी पार्कच्या मैदानावर तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली. उपस्थितांमध्ये स्टीलचा डबा फिरवून देणगी जमा करण्यात आली होती.
4/11

मेळाव्याला एकाही पोलिसाचं संरक्षण नव्हतं. महाराष्ट्रातील अनेक पैलवानांकडे सुरक्षेची धुरा सोपवण्यात आली होती. मेळाव्यासाठी चाळी, छोट्या खोल्या, व्यायामशाळांत बैठका झाल्या होत्या.
5/11

1975 साली दसरा मेळाव्यातूनच शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला.
6/11

1982 साली शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आले होते. 1985 साली शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मेळाव्यात जाहीर करण्यात आली.
7/11

1991 च्या मेळाव्यात वानखेडेवरील भारत-पाक सामन्याला विरोध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला. 1996 साली राज ठाकरेंच्या कल्पनेतल्या शिवउद्योग सेनेची घोषणा करण्यात आली.
8/11

2010 साली आदित्य ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातच लॉन्चिंग करण्यात आले. युवा सेना या संघटनेची घोषणा करण्यात आली.
9/11

2011 साली बाळासाहेबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अखेरचा मेळावा पार पडला.
10/11

2012 साली प्रकृतीमुळे बाळासाहेबांचं रेकॉर्डेड भाषण दाखवलं.
11/11

2013 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातला पहिला मेळावा पार पडला.
Published at : 24 Oct 2023 04:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























