एक्स्प्लोर
Sangmeshwar Landlide : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला, मोठ्या भेगा
Ratnagiri Landslide : चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत.
Ratnagiri Landslide
1/8

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत.
2/8

तसेच रस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काही ठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले.
3/8

चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या.
4/8

या वर्षीही अती वृष्टीमुळे पुन्हा भेगा पडल्या आहेत.तर आडवी पेणी,भागात या वर्षी जमीन फाटली आहे.भटाच्या कोंडाकडे जाणार रस्ता ही फाटला आहे.रस्त्याला फेगा पडल्या आहेत.
5/8

चाफवली गावातील डोंगराला भगदाडे पडलेल्या भागातील वाडीतील दोन घराना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.महसूल आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
6/8

पावसाचा जोर थोडा मंदावला आहे, मात्र वाढल्यास या भागातील काही घराना धोका निर्माण होवू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
7/8

चाफवलीतील काही घरे ही भीतीच्या छायेखाली असून ज्या डोंगराना भेगा गेल्या आहेत त्या भेगामधून पाण्याचा प्रवाह वाहतो आहे.
8/8

या पाण्याच्या प्रवाहामुळेच डोंगराला भेगा गेल्याचे म्हटले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास डोंगर सरकू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Published at : 29 Jul 2023 11:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























