एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg : भाजपा कार्यकर्त्यांकडून समृद्धी महामार्गाचा वाढदिवस साजरा; टोल प्लाझावर कापला केक
भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूर टोलवर आज समृद्धी महामार्गाचा वर्धापन दिन साजरा केला. समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज भाजप कार्यकर्त्यांनी टोल प्लाझावर केक कापला.
samruddhi mahamarg
1/7

राज्याची उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबईला जोडणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पतंप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी केले होते.
2/7

एक वर्षापूर्वी ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या हस्ते नागपूर येथील टोलवर उद्घाटन करुन हा महामार्ग सुरू केला होता.
3/7

आज त्याच ठिकाणी वर्षपूर्ती निमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गाचा वाढदिवस साजरा केला. वाहनचालकांना केक देऊन शुभेच्छा दिल्यात.
4/7

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू करण्यात आला होता.
5/7

समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर वाढत्या अपघातांच्या संख्येने चिंता वाढली होती.
6/7

त्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. त्याच्या परिणामी आता अपघातांची संख्या कमी झाली आहे.
7/7

पुढील वर्षात नाशिक ते मुंबई हा उर्वरित टप्पाही सुरू होण्याची शक्यता आहे.
Published at : 11 Dec 2023 06:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























