एक्स्प्लोर
PHOTO : अखेर पपईच्या दरावर तोडगा; किती मिळणार भाव?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/6d27fd525183f5c7c4db162afd43415d_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dhule Nandurbar News Updates
1/7
![Dhule Nandurbar News Updates : नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी व्यापारी पपईला दर देत नसल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकी निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/b7346ebdee879fb8deec6a13d377b53e84a06.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dhule Nandurbar News Updates : नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी व्यापारी पपईला दर देत नसल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकी निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
2/7
![पंधरा दिवसानंतर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपई उत्पादक शेतकरी बाजार समिती आणि व्यापारी तसेच शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पपई दरासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आता पपईला प्रतिकिलो 6 रुपये 41पैसे दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/e40b9ce8e9e9a2342124d2035251f2a8aa7dc.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंधरा दिवसानंतर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपई उत्पादक शेतकरी बाजार समिती आणि व्यापारी तसेच शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पपई दरासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आता पपईला प्रतिकिलो 6 रुपये 41पैसे दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3/7
![चार तास चाललेल्या बैठकीत पहिला पपईला सहा रुपये 41 दर सर्वसंमतीने ठरविण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/3486eaa1acc44a00f08f71a741f2023aa659a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार तास चाललेल्या बैठकीत पहिला पपईला सहा रुपये 41 दर सर्वसंमतीने ठरविण्यात आला आहे.
4/7
![पपईला उत्तर भारतात मागणी नसल्याने जास्तीचा दर देऊ शकत नसल्याचे व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती यांनी आपली भूमिका मांडत 6 रुपये 41 पैशाचा दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी आता पपई तोड सुरू करावी असे आवाहन शेतकरी संघटना आणि बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पंधरा दिवस पपई तोड बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनीही आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/b53ea030123ca2da272d1714a023e372ab05f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पपईला उत्तर भारतात मागणी नसल्याने जास्तीचा दर देऊ शकत नसल्याचे व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समिती यांनी आपली भूमिका मांडत 6 रुपये 41 पैशाचा दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी आता पपई तोड सुरू करावी असे आवाहन शेतकरी संघटना आणि बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पंधरा दिवस पपई तोड बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनीही आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
5/7
![नंदुरबार जिल्ह्यात चार हजार हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात येत असते. मात्र या वर्षी व्यापरिंच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्तर भारतातील व्यापारी पपई खरेदीसाठी येत असतात. या वर्षी पण व्यापारी आले आहेत मात्र दराच्या संदर्भात पहिल्या पासून व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/a7b97226f3e6cc97d06a1f16b134e500ef424.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंदुरबार जिल्ह्यात चार हजार हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात येत असते. मात्र या वर्षी व्यापरिंच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्तर भारतातील व्यापारी पपई खरेदीसाठी येत असतात. या वर्षी पण व्यापारी आले आहेत मात्र दराच्या संदर्भात पहिल्या पासून व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळत आहे.
6/7
![नंदुरबार जिल्ह्यात सुरवातीला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होते. व्यापारी आणि शेतकरी संघर्ष झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून 7.51 पैशांचा दर जाहीर झाला होता. मात्र शेतकरी समाधानी नव्हते त्यांनी 11रुपये दराची मागणी केली मात्र व्यापारी तयार नव्हते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/3486eaa1acc44a00f08f71a741f2023a83e1e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंदुरबार जिल्ह्यात सुरवातीला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होते. व्यापारी आणि शेतकरी संघर्ष झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून 7.51 पैशांचा दर जाहीर झाला होता. मात्र शेतकरी समाधानी नव्हते त्यांनी 11रुपये दराची मागणी केली मात्र व्यापारी तयार नव्हते.
7/7
![त्यावेळी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा समन्वय न झाल्याने पपई तोड करू नये असा निर्णय घेतला होता. आज अखेर 6 रुपये 41 पैशाचा दर निश्चित करण्यात आला आहे. आता तोड सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/e40b9ce8e9e9a2342124d2035251f2a800297.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा समन्वय न झाल्याने पपई तोड करू नये असा निर्णय घेतला होता. आज अखेर 6 रुपये 41 पैशाचा दर निश्चित करण्यात आला आहे. आता तोड सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे.
Published at : 02 Mar 2022 03:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)