Nanded : छत्रपती संभाजी राजेंनी घेतला जंगल सफारीचा आनंद
By : धनंजय सोळंके | Updated at : 16 Jan 2022 09:34 PM (IST)
sambhajiraje1111
1/7
नांदेड येथील किनवट अभयारण्यात छत्रपती संभाजी राजेंनी घेतला जंगल सफारीचा आनंद.
2/7
नांदेड येथे खासगी कामानिमित्त आलेल्या छत्रपती संभाजी राजेंनी यावेळी श्री क्षेत्र माता रेणुकादेवी मंदिर माहूरगड येथे भेट दिली.
3/7
मंदिर समितीकडून त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
4/7
छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी जंगलातून कमी होत असलेल्या वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय, हरीण ह्या जंगली प्राण्यांचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने किनवट अभयारण्यात फेरफटका मारला.
5/7
तसेच किनवट माहूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल सफारी व पर्यटन विकासास याठिकाणी मोठा वाव असल्याचेही प्रामुख्याने नमूद केले.
6/7
येत्या काळात या जंगलातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी व येथील पर्यटनाला वाव देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
7/7
छत्रपती संभाजी राजेंनी घेतलेल्या जंगल सफारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.