एक्स्प्लोर
Beed : शेतकऱ्याच्या मुलीची जिद्द! पहिल्याच प्रयत्नात झाली IES, यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली

Beed6
1/7

जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात IES .बीडच्या शेतकऱ्याची मुलगी upsc परीक्षेत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर
2/7

मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलींने यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान या मुलीने मिळावलाय.
3/7

बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी राहूनच अभ्यास करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया या बीडच्या कन्येने केली आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असं त्या तरुणीचे नाव आहे. श्रद्धा यांनी युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळविला आहे..
4/7

श्रद्धा यांचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत. श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले.
5/7

नंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करुन 2018 साली अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सात महिने शिकवणी केली
6/7

याविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून श्रद्धाची जिद्द होती शिकायची, तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धा हिला मी मुलाप्रमाणे सांभाळले आहे
7/7

मुलापेक्षा जास्त तिला मी समजत आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही, लोक म्हणतात मुलगी आहे, 18- 20 वर्ष झाले की लग्न करायचं, नको शिकवायचं. मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळं आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Published at : 14 Jan 2022 10:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
