एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोणावळ्याची चिक्की तर ऐकली आहे, पण लोणावळ्याचे 'हे' जिभेला पाणी सोडणारे पदार्थ माहित आहेत का?
Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा
![Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/12878b4e38f52ecb55e0679362fde8d2170331602804794_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lonavala Restaurants
1/8
![(Photo credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/9f21c304ba7b14786293483b42c5c0c6bd33e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo credit : Unsplash)
2/8
![मुंबई आणि पुण्यातील माणसांसाठी लोणावळा (Lonavala) म्हणजे हक्काचं पर्यटन ठिकाण. रोजच्या रुटिनचा अगदीच कंटाळा आला की लोक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात आणि सुट्टीचा आनंद घेतात. अगदी तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला भेट देण्यासाठी सुट्टीचा एक दिवस देखील पुरेसा असतो. (Photo credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/59d0f9f09b25823074a9dc905861521c9bfc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई आणि पुण्यातील माणसांसाठी लोणावळा (Lonavala) म्हणजे हक्काचं पर्यटन ठिकाण. रोजच्या रुटिनचा अगदीच कंटाळा आला की लोक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात आणि सुट्टीचा आनंद घेतात. अगदी तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला भेट देण्यासाठी सुट्टीचा एक दिवस देखील पुरेसा असतो. (Photo credit : Unsplash)
3/8
![आता लोणावळा म्हटलं की पहिला आठवतो तो हिरवागार निसर्ग, डोंगर-धबधबे, प्रचलित असे टायगर पॉईंट (Tiger Point) अन् लायन पॉईंट (Lion Point)... त्यानंतर रस्त्याला लागूनच असलेली मगनलाल चिक्कीची दुकानं (Maganlal Chikki Shops). पण त्याही पलीकडे जाऊन खवय्यांसाठी आता लोणावळा (Lonavala) खास ठरतंय.(Photo credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/d2ac38691b3a345f94a019a5646d5b5bdb3e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता लोणावळा म्हटलं की पहिला आठवतो तो हिरवागार निसर्ग, डोंगर-धबधबे, प्रचलित असे टायगर पॉईंट (Tiger Point) अन् लायन पॉईंट (Lion Point)... त्यानंतर रस्त्याला लागूनच असलेली मगनलाल चिक्कीची दुकानं (Maganlal Chikki Shops). पण त्याही पलीकडे जाऊन खवय्यांसाठी आता लोणावळा (Lonavala) खास ठरतंय.(Photo credit : Unsplash)
4/8
![आपल्यापैकी अनेकांनी हॉटेल 7/12 बद्दल याआधीही ऐकलं असेल. अस्सल कोल्हापुरी चवीच्या जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. याआधी कोल्हापूर आणि पुण्यात या हॉटेलच्या शाखा होत्या. परंतु आता लोणावळ्यात देखील आपल्याला अस्सल कोल्हापुरी चव चाखता येणार आहे. हॉटेल 7/12 (Hotel 7/12, Lonavala) मध्ये मिळणाऱ्या जेवणाला घरगुती गावरान जेवणाची चव आहे. घोंगडीवर बसून बैठ्या आसन पद्धतीत चिकन, मटणाच्या जेवणाची मज्जा घेण्याची गोष्टच काही और आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/69b6fba3e8d32ca2f8949861353199149848e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्यापैकी अनेकांनी हॉटेल 7/12 बद्दल याआधीही ऐकलं असेल. अस्सल कोल्हापुरी चवीच्या जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. याआधी कोल्हापूर आणि पुण्यात या हॉटेलच्या शाखा होत्या. परंतु आता लोणावळ्यात देखील आपल्याला अस्सल कोल्हापुरी चव चाखता येणार आहे. हॉटेल 7/12 (Hotel 7/12, Lonavala) मध्ये मिळणाऱ्या जेवणाला घरगुती गावरान जेवणाची चव आहे. घोंगडीवर बसून बैठ्या आसन पद्धतीत चिकन, मटणाच्या जेवणाची मज्जा घेण्याची गोष्टच काही और आहे
5/8
![लोणावळा शहराच्या अगदी मधोमध असलेलं, खवय्यांच्या मनात बसेल असं ठिकाण म्हणजे - हॉटेल मावळ मराठा (Hotel Maval Maratha). मुख्य रस्त्याला लागून असलेलं ढाबा स्टाईलमधील हे हॉटेल तेथील गावरान चवीच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/4fc4195fd4c21a979affa8cd15f9ab1139072.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोणावळा शहराच्या अगदी मधोमध असलेलं, खवय्यांच्या मनात बसेल असं ठिकाण म्हणजे - हॉटेल मावळ मराठा (Hotel Maval Maratha). मुख्य रस्त्याला लागून असलेलं ढाबा स्टाईलमधील हे हॉटेल तेथील गावरान चवीच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.
6/8
![महाबळेश्वरमधील मेप्रो गार्डनचा अनुभव आता लोणावळ्यात देखील घेता येतो, कारण याचीच एक शाखा लोणावळ्यात (Mapro Garden, Lonavala) देखील सुरू झाली आहे. जर तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम, फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रिम चाखण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळ्यातील मेप्रो गार्डन एक उत्तम ठिकाण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/163b2779147acfb61724d264c1556bee97803.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाबळेश्वरमधील मेप्रो गार्डनचा अनुभव आता लोणावळ्यात देखील घेता येतो, कारण याचीच एक शाखा लोणावळ्यात (Mapro Garden, Lonavala) देखील सुरू झाली आहे. जर तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम, फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रिम चाखण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळ्यातील मेप्रो गार्डन एक उत्तम ठिकाण आहे.
7/8
![मुंबईतून जे पर्यटक लोणावळ्याला जातात, त्यांनी नाश्त्यासाठी खंडाळा घाटातील सितारा गार्डन रेस्टॉरंटमध्ये (Sitara Garden Restaurant) नक्की थांबावं. येथील खाद्यपदार्थांपेक्षा गार्डन व्ह्यू असणारी आसन व्यवस्था आणि थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देतो. त्यात या हॉटेलमध्ये मिळणारा गरमागरम चहा आणि वडापाव खाण्याचा आनंदच काही वेगळा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/2a827d5d484da8f5c22bf2184c5c828f02d3d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतून जे पर्यटक लोणावळ्याला जातात, त्यांनी नाश्त्यासाठी खंडाळा घाटातील सितारा गार्डन रेस्टॉरंटमध्ये (Sitara Garden Restaurant) नक्की थांबावं. येथील खाद्यपदार्थांपेक्षा गार्डन व्ह्यू असणारी आसन व्यवस्था आणि थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देतो. त्यात या हॉटेलमध्ये मिळणारा गरमागरम चहा आणि वडापाव खाण्याचा आनंदच काही वेगळा आहे.
8/8
![मटकीची मिसळ तर तुम्ही खाल्लीच असेल. पण तुम्ही कधी चिकन मिसळचा आस्वाद घेतलाय का? ऐकूनच कुतूहल वाटत असेल ना? तर हो, लोणावळ्यात एक असं ठिकाण आहे, जिथे चिकन मिसळ खाण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. लोणावळ्यातील तुंगर्ली गावात असलेलं मराठी झटका हे हॉटेल (Hotel Marathi Zatkaa, Lonavala) तिथल्या मिसळसाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/8660fd7b6520286c6bcc1e5b25fa17ab881c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मटकीची मिसळ तर तुम्ही खाल्लीच असेल. पण तुम्ही कधी चिकन मिसळचा आस्वाद घेतलाय का? ऐकूनच कुतूहल वाटत असेल ना? तर हो, लोणावळ्यात एक असं ठिकाण आहे, जिथे चिकन मिसळ खाण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. लोणावळ्यातील तुंगर्ली गावात असलेलं मराठी झटका हे हॉटेल (Hotel Marathi Zatkaa, Lonavala) तिथल्या मिसळसाठी प्रसिद्ध आहे.
Published at : 23 Dec 2023 01:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)