एक्स्प्लोर
PHOTO: राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात! सोबत लेझीम, हलगी अन् मर्दानी खेळ... कोल्हापूरकरांकडून 'भारत जोडो'चं भन्नाट स्वागत
कोल्हापुरी पैलवान आणि कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता शेळोली, कळमनुरीच्या रस्त्यावर. तर या कुस्तीसाठी खास प्रेक्षक होते ते खुद्द राहुलजी गांधी, ते कुस्ती औत्सुक्याने न्याहाळत होते.

Rahul Gandhi
1/10

कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत केले. नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही जोरदार स्वागत केले आहे.
2/10

कोल्हापुरी पैलवान आणि कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता शेळोली, कळमनुरीच्या रस्त्यावर. तर या कुस्तीसाठी खास प्रेक्षक होते ते खुद्द राहुलजी गांधी, ते कुस्ती औत्सुक्याने न्याहाळत होते.
3/10

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी अख्खे कोल्हापूरच आज कळमनूरीच्या रस्त्यावर उतरवले होते. कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध प्रतिकांना त्यांनी भारत जोडो यात्रेशी जोडले होते.
4/10

पुढे हलगीचा कडकडाट होता आणि त्याच तालावर लेझीम पथकाने ठेका धरला. लवलवत्या पात्याच्या दांडपट्टाच्या चित्तथरारक कसरती सुरू होत्या. तर काही तरुणी लाठीकाठी या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवत होत्या.
5/10

कोल्हापूरची शान समजल्या जाणाऱ्या, तुरा खोचलेल्या भगव्या फेट्यातील दहा हजार कार्यकर्त्यांची फौज नजरेच्या टप्यातही येत नव्हती.
6/10

फेट्यांच्या लांबच्या लांब रांगा दिसत होत्या. सगळं वातावरणच भगवामय झाले होते
7/10

अस्सल मराठीमोळी संस्कृतीचे दर्शन राहुल गांधींना घडवत कोल्हापूरकरांनी भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत केले.
8/10

कुस्ती आणि हलगी, मर्दानी खेळ ही कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा दर्शवत आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.
9/10

ही यात्रा जातीधर्मातील भेद, द्वेष मिटवून सर्वांना प्रेमाने एकत्र आणणारी आहे. या यात्रेचा उद्देश नक्कीच सफल होईल, अशी माझी खात्री आहे, असंही ते म्हणाले.
10/10

ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत 20 तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.
Published at : 12 Nov 2022 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
