एक्स्प्लोर
Dilip Gandhi : माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये होते मंत्री
Dilip Gandhi
1/6

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले.
2/6

काल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3/6

दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.
4/6

दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. 2009, 2014 ला देखील ते पुन्हा निवडून आले.
5/6

2003-2004 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
6/6

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांना तिकिट नाकारलं गेलं. त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र तरीही नाराज न होता त्यांनी पक्षाचं काम सुरुच ठेवलं.
Published at : 17 Mar 2021 07:53 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























