एक्स्प्लोर
Almatti Dam : अलमट्टी धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग वाढवल्याने कोल्हापूर, सांगलीला दिलासा, धरणात 71 टक्के पाणीसाठा
Almatti Dam : अलमट्टी धरणात पाणी पातळी 517.23 मीटर झाली असून गेल्या 10 तासांपासून 1,75,711 क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरु आहे. सध्या धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

Almatti Dam
1/15

कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणात पाणी पातळी 517.23 मीटर झाली आहे.
2/15

गेल्या 10 तासांपासून 1,75,711 क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरु आहे.
3/15

गेल्या 10 तासांपासून धरणातून 41,100 क्युसेकने विसर्ग सुरु होता.
4/15

सध्या धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
5/15

धरणात 87.355 टीएमसी (70.97 टक्के) पाणीसाठा झाला आहे.
6/15

धरण पाणीक्षमता 123.01 टीएमसी आहे.
7/15

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
8/15

लमट्टी धरण व हिप्परगे बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यावर कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
9/15

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज कोल्हापुरात बोलताना सांगितले की, 517.5 मीटर पर्यंत पाणीपातळी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
10/15

कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कालपासून (25 जुलै) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
11/15

धरणातून सध्या कोयना नदीपात्रात 1050 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. कोयना धरणात 61.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
12/15

चांदोली धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 27.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज (26 जुलै) धरणातून 2456 क्युसेकने वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
13/15

धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
14/15

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.
15/15

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत. धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
Published at : 26 Jul 2023 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
