एक्स्प्लोर
Jalna Municipal Corporation : राज्यातील 29 वी 'जालना महानगरपालिका' कशी दिसतेय?, पाहा फोटो
Jalna Municipal Corporation : राज्यातील 29 वी महानगरपालिका म्हणून जालना मनपा अस्तित्वात आली आहे.

Jalna Municipal Corporation
1/8

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेत करण्यात आलं आहे.
2/8

9 मे 2023 रोजी महानगरपालिकेचे प्रारुप प्रसिद्ध करुन आठ जून 2023 पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या.
3/8

या काळात 8 हरकती आल्या होत्या. त्या हरकती शासनाकडे पाठवण्यात आल्या होत्या. त्यावरुन शासन स्तरावर निर्णय होऊन जालना नगरपालिकेच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे.
4/8

जालना नगरपालिकेला महानगरपालिका जाहीर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती.
5/8

जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे.
6/8

त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी मागणी करण्यात येत होती.
7/8

त्यामुळे प्रशासनाने जालना महानगरपालिकेची घोषणा करून तत्पुर्वी हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.
8/8

एकूण आठ हरकती आल्या होत्या. त्यावर विचार करुन अखेर शासनाने महानगरपालिकेचा निर्णय घेतला आहे.
Published at : 09 Aug 2023 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion