BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
भाजपकडून हर्षदा नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता त्यांच्या विरोधात मुंबई भाजप उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी केल्याने हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

BMC Election: मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. आमदार खासदारांच्या नातलगांना तिकीट दिलं जाणार नाही अशी घोषणा भाजपने करूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरामध्ये तब्बल तीन जणांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रवीण दरेकरांचा भाऊ, मुंबई भाजप अध्यक्ष मेव्हणा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं देण्यात आली आहेत. बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहिण गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई भाजप उपाध्यक्षांची बंडखोरी
वॉर्ड क्रमांक 225 मधून भाजपकडून हर्षदा नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता त्यांच्या विरोधात मुंबई भाजप उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी केल्याने हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वार्ड क्रमांक 225 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुजाता सानप सुद्धा रिंगणात आहेत. कमलाकर दळवी यांनी केलेल्या बंडखोरीमुळे हर्षिता नार्वेकर यांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. प्रभाग क्रमांक सातमध्येही शिवसेनेचे भूपेंद्र काशिनाथ कवळींनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गोरेगाव, चेंबूरमध्येही बंडखोरी
गोरेगावमध्येही भाजपचे महामंत्र्यांकडून बंडखोरी करण्यात आली आहे. गोरेगावमध्ये प्रभाग क्रमांक 54 मध्ये भाजप महामंत्री संदीप जाधव इच्छुक उमेदवार होते. मात्र, त्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यात आल्याने संदीप जाधव यांची नाराजी उफाळून आली आहे. त्यांनी आज भाजप महामंत्रीपदाचा राजीनामा देत वार्ड क्रमांक 54 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चेंबूरमध्येही भाजपमध्ये मोठी बंडखोरी समोर आली आहे. या ठिकाणी आयात उमेदवाराला संधी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 155 मधून भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांकडून बंडाचे निशाण फडकवण्यात आलं आहे. भाजपकडून दोन दिवसांपूर्वी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे. इथं श्रीकांत शेटे उमेदवार असणार आहेत. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत प्रवेश केला आहे.
दुसरीकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे घाटकोपर वार्ड क्रमांक 29 मध्ये भाजपमध्ये बंडाची लागण झाली आहे. भाजपमधून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांना उमेदवारी दिल्याने मोठी नाराजी पसरली आहे. या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या भावाची पत्नी सुरेखा गवळी आणि भाजप पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या पत्नी मालती पाटील यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















