Akshaye Khanna Dhurandhar Fees: 'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?
Akshaye Khanna Dhurandhar Fees: बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' सिनेमातल्या त्याच्या अभिनयामुळे चर्चेत आहे.

Akshaye Khanna Dhurandhar Fees: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एक सिनेमा प्रचंड धुमाकूळ घालतोय, तो म्हणजे, 'धुरंधर' (Dhurandhar Movie). हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) नावानं ओळखला जात होता, पण, 'धुरंधर' (Dhurandhar) रिलीज झाल्यानंतर चर्चा रंगलीये फक्त आणि फक्त बॉलिवूडचा (Bollywood) दिग्गज अभिनेता अक्षय खन्नाची (Akshaye Khanna). गेल्या काही दिवसांपासून अक्षय खन्नाच्या फिल्म्सचा ग्राफ पाहिला तर, त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकण्याची एकही संधी सोडलेली नाही. तसं पाहायला गेलं तर, सुपरस्टार विनोद खन्ना यांचा लेक असलेला स्टारकीड अक्षय खन्नाला इंडस्ट्रीत तब्बल वीसहून अधिक काळ लोटला आहे. पण, सुरुवातीला फारसं लक्ष वेधू न शकलेला हा हरहुन्नरी अभिनेता गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.
अक्षय खन्नानं 'धुरंधर'मध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत तर रणवीर सिंह झळकलाय, पण अक्षय खन्नानं साकारलेल्या 'रहमान डकैत'नं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. 'धुरंधर' पाहताना अक्षय खन्नावरुन नजर हटवणं जवळपास अशक्यच. अक्षय खन्नानं 'रहमान डकैत'च्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय. जरी रणवीर लीड रोलमध्ये असला तरीसुद्धा अक्षय खन्नाचा कोल टॉप-नॉच आहे. पण, तुम्हाला माहितीय का? अक्षय खन्नानं 'धुरंधर'मध्ये 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती मानधन घेतलंय?
View this post on Instagram
'धुरंधर'साठी अक्षय खन्नानं किती पैसे घेतले?
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, 250 कोटींमध्ये बनलेल्या 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहला 30 ते 50 कोटी रुपयांपर्यंतचं मानधन दिलं गेलंय. तर 'रहमान डकैत' साकारण्यासाठी अक्षय खन्नाला कथितरित्या 2.5 कोटींचं मानधन दिलं गेलंय. दरम्यान, समोर आलेल्या मानधनाच्या आकड्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, अक्षय खन्नावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाच अव्वल
कधीकाळी 'लव्हर बॉय' भूमिकांसाठी ओळखला जाणारा अक्षय खन्ना आता हटके भूमिका साकारताना दिसतोय. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'छावा' मधला मुघल बादशाह औरंगजेब आणि 'धुरंधर'मध्ये साकारलेला 'रहमान डकैत' या भूमिकांनी अक्षयला इंडस्ट्रीत व्हिलन म्हणून नवी जागा दिलीय. अक्षय खन्नाच्या खलनायकी भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. व्हायरल बॅकग्राउंड म्युझिकसोबत 'धुरंधर'मधील त्याची एन्ट्री सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण अक्षय खन्नाच्या दमदार कमबॅकची तुलना बॉबी देओलशी करत आहेत, ज्यानं अॅनिमलमध्ये असाच अभिनय केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















