एक्स्प्लोर
Tulip Garden Srinagar: श्रीनगरचं ट्युलिप गार्डन पर्यटकांनी फुलले, 32 दिवसांत साडे तीन लाख पर्यटकांची भेट
Tulip Garden Srinagar: गार्डन खुले झाल्यानंतर 32 दिवसांत येथे 3.7 लाख पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक विदेशी पर्यटक होते
Image Source - PTI
1/10

काश्मीरमध्ये नवा पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.
2/10

गार्डन खुले झाल्यानंतर 32 दिवसांत येथे 3.7 लाख पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक विदेशी पर्यटक होते
3/10

यंदा एप्रिलअखेरपर्यंत हे उद्यान पाहण्यासाठी सुमारे पाच लाखांवर पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे.
4/10

सध्या विविध प्रजातींची16 लाख फुले फुलल्याचे दिसते.
5/10

ट्युलिप गार्डनमध्ये यंदा 68 प्रकारच्या ट्युलिप्सची लागवड करण्यात आली आहेत. त्यापैकी चार नव्या जातीचे ट्यूलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे.
6/10

ट्युलिप गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात.
7/10

ट्युलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.
8/10

उद्घाटनच्या कार्यक्रमाला परदेशातील देखील पर्यटक उपस्थित होते.
9/10

ट्युलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे.
10/10

पूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते.
Published at : 22 Apr 2023 08:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























