एक्स्प्लोर
Super Blue Moon: वाह! आकाश निळ्या चंद्राने उजळलं; फोटोतून पाहा चंद्राची सुंदर दृश्यं
Super Blue Moon Photo: चंद्र या क्षणी पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने तो आकाराने मोठा आणि अतिशय तेजस्वी दिसत आहे. सोशल मीडियावरही 'सुपर ब्लू मून'चा ट्रेंड सुरू झाला आहे.

Super Blue Moon Photo
1/10

भारताचं मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाल्याचा आनंद देशभरात साजरा होत असताना आज चंद्राचं वेगळं रुप आकाशात पाहायला मिळत आहे.
2/10

आज श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा असून चंद्राचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे.
3/10

आकाशात एक दुर्मिळ सुपर ब्लू मूनचं दृश्य अवतरलं आहे.
4/10

वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असून सुपर ब्लू मून ही घटना दशकातून एकदाच घडत असल्याचं खगोलीय शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
5/10

चंद्राचं हे रुप डोळ्यांची पारणं फेडणारं आहे.
6/10

आकाशात एकाचवेळी पूर्ण चंद्र, सुपरमून आणि ब्लू मून एकत्र दिसत आहे, यालाच खगोलीय भाषेत 'सुपर ब्लू मून'म्हणतात.
7/10

आकाशात 'सुपर ब्लू मून' पाहण्याची आज पर्वणी ठरली आहे.
8/10

सोशल मीडियावरही सध्या सुपर ब्लू मून ट्रेंड होत असून नेटीझन्सकडून आपल्या मोबाईलमध्ये चंद्राचा हा नजारा कैद केला जात आहे.
9/10

सोशल मीडियावरही ब्लू मूनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेटकरी अपलोड करत आहेत.
10/10

चंद्राच्या प्रकाशाने आज अनेक शहरं तेजोमय झाली आहेत.
Published at : 30 Aug 2023 10:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
