मोबाईल ऑक्सिजन बस ही संकल्पना देशात सर्वप्रथम कर्नाटकात राबवण्यात आली आहे. यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या कोरोना रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळणे शक्य होणार आहे.
2/6
बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय आवारात मोबाईल ऑक्सिजन बसचे उद्घाटन करण्यात आले.
3/6
प्रवासी बसमध्येच ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करून मोबाईल ऑक्सिजन बस तयार करण्यात आली आहे. बसमध्ये ठराविक अंतर सोडून ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात आले आहेत.
4/6
होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्वरित ही मोबाईल ऑक्सिजन बस तेथे पोचणार असून रुग्णाला त्वरित ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
5/6
काही वेळा रुग्ण हॉस्पिटलमधे दाखल होण्यासाठी आलेला असताना ऑक्सिजनची गरज भासल्यास हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मोबाईल ऑक्सिजन बसमध्ये रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधे दाखल करून घेण्यास काही कारणाने उशीर झाला तरी रुग्णाला ऑक्सिजन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
6/6
मोबाईल ऑक्सिजन बसचा देशात सगळ्यात प्रथम कर्नाटकमध्ये उपयोग करण्यात आला आहे.मोबाईल ऑक्सिजन बस मुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.