एक्स्प्लोर
Aditya-L1 Mission : अशी सुरु झाली मिशन आदित्यची गोष्ट, शास्रज्ञांनी सांगितला संपूर्ण प्रवास
Aditya-L1 Mission : भारत शनिवार 2 सप्टेंबर रोजी सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे.
Aditya-L1 Mission
1/10

पण या मिशन आदित्यचा प्रवास कसा सुरु झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
2/10

यासंदर्भात बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) चे प्राध्यापक जगदेव सिंह यांनी माहिती दिली आहे.
3/10

सुरुवातील फक्त 800 किमीचा प्रवास करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
4/10

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे.
5/10

तसेच हे यान प्लाझ्माचा देखील अभ्यास करणार असल्याचं म्हटलं आहे.
6/10

16 फेब्रुवारी 1980 रोजी भारतात संपूर्ण सूर्यग्रहण झाले होते.
7/10

त्यावेळी आयआयएचे संस्थापक-संचालक एमके वेणू बाप्पू यांनी जगदेव सिंह यांना सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
8/10

पंरतु ग्रहणकाळात फक्त 5-7 मिनिटचं सूर्याचा अभ्यास करता येत होता. सखोल अभ्यासासाठी हा कालावधी पुरेसा नव्हता.
9/10

त्यानंतर त्यांनी इस्रो आणि इतर संस्थांशी याबाबत चर्चा केली.
10/10

2009 मध्ये याविषयी चर्चा करण्यास सुरुवात झाली आणि 2012 मध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Published at : 02 Sep 2023 12:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























