एक्स्प्लोर

Transgender Beauty Queen : दहाव्या वर्षी कुटुंबाने काढलं घराबाहेर, कधी मागितली भीक, तर कधी सेक्स वर्करचं काम; ट्रान्सजेंडर ब्युटी क्वीन 'नाज'ची काळजाला भिडणारी कहाणी

Transgender Beauty Queen Naaz Joshi : नाज जोशीचा जन्म दिल्लीतील एका कुटुंबात झाला. मुलगा असूनही नाजला मुलीसारखं राहायला आवडायचं हे कळताच घरच्यांनी नाजला घराबाहेर हाकललं.

Transgender Beauty Queen Naaz Joshi

1/14
नाज जोशी (Naaz Joshi) हिने इंटरनेशनल ब्युटी क्वीन 2022 चा किताब जिंकला. आता तुम्हाला ही गोष्ट ऐकायला सामान्य वाटत असेल पण, नाजसाठी हा मोठा संघर्ष होता.

2/14
नाज जोशीने भारतातील पहिली ट्रांसजेंडर ब्युटी क्वीन होण्याचा मान मिळवला. आज नाजनं समाजात आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. पण येथे पोहोचण्यापर्यंतचा तिचा संघर्ष फारच खडतर होता.

3/14
हे यश मिळण्यासाठी तिला खूप मोठ्या आव्हानांना आणि अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. अनेक कठीण प्रसंगावर मात करत नाज जोशीने इंटरनॅशनल ब्युटी क्वीनचा मुकुट आपल्या नावे केला.

4/14
नाज जोशीचा जन्म दिल्लीतील एका संपन्न कुटुंबात झाला. नाज हळूहळू मोठी झाल्यावर मुलगा असूनही तिला मुलीसारखं राहायला आवडायचं. ती 8-9 वर्षांची झाल्यावर तिचं वागणं बोलणं मुलींसारखं भासू लागलं. हे सर्व पाहून शेजारीपाजारी तिच्यावर कमेंट करू लागले.

5/14
हळूहळू घरच्यांना कळलं की, नाज ट्रान्सजेंडर आहे. तेव्हा तिचे घरचेही तिचा तिरस्कार करू लागले आणि मग वयाच्या दहाव्या वर्षी नाजला आई-वडीलांनी घरातून हाकलून दिलं. घरातून बाहेर काढल्यावर नाज मुंबईत राहणाऱ्या तिच्या मामाकडे गेली.

6/14
वयाच्या 10 व्या वर्षी नाज दिल्लीहून मुंबईत आली, पण संकटांनी तिची साथ सोडली नाही. नाजला तिच्या मामाने ढाब्यावर नोकरी मिळवून दिली.

7/14
एके दिवशी ती ढाब्यावर काम करून घरी परतली, तेव्हा तिच्या मामाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत दारू पित बसला होता. त्यांनी नाजला दारू देऊ केली, पण तिने नकार दिला. यानंतर त्यांनी नाजला कोल्ड्रिंकमधून दारू दिली. ते प्यायल्यावर ती बेशुद्ध झाली.

8/14
यानंतर मामाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गँगरेपची माहिती मिळताच नाजचा मामा तिला उपचाराच्या बहाण्याने रुग्णालयात घेऊन गेला आणि तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मामा परत आलाच नाही.

9/14
दवाखान्यात दाखल झाली तेव्हा, नाजचे ना घर होते, ना स्वतःचे कोणी. यावेळी एका तृतीयपंथीयाची नजर नाजवर पडली. ती नाजला घेऊन तिच्या गुरूकडे गेली. त्या गुरूने नाजला भिक मागायला लावले. यानंतर तिला बारमध्ये डान्स करायला लावले.

10/14
इतकंच नाही तर त्या काळात नाजला बळजबरीने अनेकवेळा सेक्स वर्कर म्हणूनही काम करावं लागलं. या सर्व आव्हानांना न जुमानता नाझने अभ्यास सुरूच ठेवला. तिने ड्राईंग एग्झाम इंटरमिजिएटही दिली होती. जेव्हा नाज 18 वर्षांची झाली तेव्हा ती या आयुष्यातील संकटामुळे अतिशय अस्वस्थ झाली आणि काही दिवस डिप्रेशनमध्येही गेली होती.

11/14
नैराश्याच्या काळात नाजला त्याच्या चुलत बहिणीची आठवण झाली. तिने बहिणीशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. इथेच नाजच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. चुलत बहिणीने नाजला मदत केली आणि तिला त्या नरकातून बाहेर काढले. यानंतर बहिणीने नाजला दिल्लीला बोलावले आणि तिला फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी दिल्लीतील NIFT मध्ये प्रवेश मिळवून दिला.

12/14
नाज जोशीने खूप मेहनतीने अभ्यास केला आणि टॉपर झाली. तिची कॅम्पस प्लेसमेंटही मिळाली. नाजने काही दिवस काम करून पैसे वाचवले. त्यानंतर त्या पैशातून लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आणि ती मुलगी झाली.

13/14
जेव्हा नाज पूर्ण मुलगी झाली तेव्हा एका प्रसिद्ध फोटोग्राफरची नजर तिच्यावर पडली. त्याने नाजला मॉडेलिंगची ऑफर दिली. ही ऑफर स्वीकारून नाझने फॅशन शो आणि ब्युटी इंडस्ट्रीच्या जगात पाऊल ठेवलं. तिनं सलग 3 वर्षे मिस वर्ल्ड डायव्हर्सिटीचा किताब पटकावला.

14/14
गेल्या वर्षी नाजने ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीनचा किताब जिंकून जगभर प्रसिद्धी मिळवली. नाज जोशीने आतापर्यंत 8 सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. यापैकी 7 आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget