एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Landing: एस. सोमनाथ, एम. शंकरन यांच्यासह भारताच्या चंद्रयान-3 मिशनमध्ये 'या' शास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान
Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयान-3 कडे जगाच्या खिळल्या आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार, भारताचं चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे.
Chandrayaan 3 Landing
1/7

चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. चंद्रावर चांद्रयानाच्या लँडिंगसाठी अवघे काहीच तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि इतर प्रमुख शास्त्रज्ञांनी तिरुपती मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. तसेच, यावेळी त्यांनी चंद्रयान-3 चं मॉडेलही चंद्राला भेट दिलं. चांद्रयान 3 च्या मोहीमेत अनेक शास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान आहे.
2/7

एस. सोमनाथ (S Somanath) : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ हे भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचे मास्टरमाइंड, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमनाथ यांनी इस्त्रोचा पदाभार स्विकारल्यापासून चांद्रयान-3, आदित्य-एल1 (सन मिशन) आणि गगनयान यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांना गती मिळाली आहे.
Published at : 22 Aug 2023 11:32 AM (IST)
आणखी पाहा























