सुरक्षा व्यवस्था, साठवणुकीचे नियम या साऱ्याच निकषांचं पालन करत इतर राष्ट्रांमध्ये या लसी पाठवण्यात आल्या.
2/7
भूतानसोबतच कोवीशिल्डच्या 1 लाख लसींचा साठा मालदिवच्या दिशेनंही रवाना करण्यात आला आहे.
3/7
मुख्य म्हणजे या परिस्थितीमध्ये भारताकडून देशातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जात आहेतच. पण, त्यासोबतच जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी जाणत मित्र राष्ट्रांनाही मदतीचा हात दिला जात आहे.
4/7
याच धर्तीचवर नुकतंच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूतानसाठी 1.5 लाख लसींचा पहिला साठा पाठवण्यातआला आहे. सीरमच्या कोविशिल्ड लसीचा हा साठा भुतानमधील थिंपू येथे दाखल होणार आहे.
5/7
भारतासह इतरही राष्ट्रांमध्ये कोरोना लसींच्या उपलब्धतेमुळं या युद्धात एक महत्त्वाचा टप्पा आला.
6/7
लसीच्या या बॉक्सवर भारतीय जनता आणि सरकारकडून एक खास भेट.... असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे मैत्रीचे हे अनोखे बंधच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (सर्व छायाचित्र सौजन्य- एएनआय/ ट्विटर)