देशाची राजधानी चांगलीच गारठली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 3 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं जोराची थंडी पडली आहे.
2/9
दिल्लीत एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरली आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळं आणि थंडीची चादर पसरल्यामुळं दिल्लीत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
3/9
देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण आहे.
4/9
उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका (Delhi Cold Weather) वाढला आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरली आहे.
5/9
दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. थंडीमुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालम आणि सफदरजंग भागात दाट धुक्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
6/9
हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' आणि धुक्याचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे
7/9
धुक्यामुळे पालम आणि सफदरजंगसह अनेक भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे. सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे.
8/9
दिल्ली एनसीआरमधील लोक थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत.
9/9
वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत असल्याचं दिसत आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळं रस्त्यावरील गर्दीही कमी दिसत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे