एक्स्प्लोर
Belgaon Waterfall: मुसळधार पावसामुळे गोकाक धबधबा प्रवाहित; पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षण, पाहा फोटो...
Belgaon Waterfall: बेळगावनजवळील गोकाकचा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण बनला आहे. गोकाक धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे.
Gokak Waterfall
1/9

घटप्रभा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे.
2/9

घटप्रभा नदीवरील हा धबधबा पावसाळ्यात अमेरिकेतील नायगारा धबधब्याची आठवण करून देतो.
3/9

भले मोठे पात्र असलेल्या घटप्रभा नदीतील पाणी पावसाळ्यात रोरावत खाली कोसळते. त्यातून होणारा आवाज, उडणारे तुषार पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो.
4/9

घटप्रभा नदीचे पाणी बावन्न मीटर उंचावरून खाली कोसळते.
5/9

यावर्षी पाऊस उशिरा आल्याने धबधबा प्रवाहित होण्यास वेळ लागला.
6/9

दरवर्षी जून महिन्याच्या मध्यात प्रवाहित होणारा धबधबा यंदा जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.
7/9

घटप्रभा नदीवरील हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून पर्यटक धबधबा पाहायला येत आहेत.
8/9

धबधबा पूर्णपणे प्रवाहित होण्याआधीच पर्यटकांनी येथे मोठी गर्दी करू म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
9/9

धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचं धाडस पर्यटकांनी सुरू केल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Published at : 26 Jul 2023 04:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
