एक्स्प्लोर
Photo : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची भव्य सभा, पाहा फोटो
BRS Meeting : तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा होत आहे.
Photo : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची भव्य सभा
1/10

शहरातील बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे.
2/10

तर सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, सभेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे.
3/10

विशेष म्हणजे या सभेतून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राजकीय घोषणा करण्याची शक्यता आहे.
4/10

तर यापूर्वी नांदेड जिल्ह्यात देखील बीसीआरच्या दोन सभा झाल्या आहेत.
5/10

त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात 'बीआरएस'च विस्तार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
6/10

भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी केसीआर यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे.
7/10

तर याची सुरुवात महाराष्ट्रातून आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातून करण्यात येत आहे.
8/10

यापूर्वी नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्यानंतर बीआरएसकडून आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली जात आहे.
9/10

'अबकी बार किसान सरकार' या टॅगलाईन खाली 'बीआरएस'कडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
10/10

त्यामुळे आगामी काळात या पक्षाला मराठवाड्यात कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Published at : 24 Apr 2023 12:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























